
दहिवडी : माण तालुक्यातील दहिवडी येथील एका नामवंत विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आईसमोरच स्वतःचे जीवन संपवले. दहिवडी- फलटण रस्त्यावरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.