अध्यक्षपदाचा फैसला शरद पवारांच्या हाती; अजित पवारांशी होणार चर्चा अन्..

Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Summary

अध्यक्षपदासाठी खासदार शरद पवार कोणाचे नाव निश्चित करणार याची उत्सुकता लागून राहिलीय.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) अध्यक्षपदासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) व राष्ट्रवादीचे नितीन पाटील (Nitin Patil) या दोघांत चुरस निर्माण झालीय. गेल्या दोन-चार दिवसांच्या घडामोडीनंतर स्वतः खासदार शरद पवार (Sharad Pawar) हेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करून अंतिम नाव विधान परिषदेचे सभापती रामराज नाईक-निंबाळकर (Ramraj Naik-Nimbalkar) यांना सांगणार आहेत. बँकेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीच्या संचालकांतूनच निवडावा, अशी सर्वांची इच्छा असल्याने खासदार शरद पवार कोणाचे नाव निश्चित करणार याची उत्सुकता लागलीय.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले असले, तरी हक्काच्या तीन जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. आमदार शशीकांत शिंदे (Shashikant Shinde), शिवाजीराव महाडिक, मनोजकुमार पोळ यांचा पराभव झाला. तर फक्त राष्ट्रवादीचे ११ तर बंडखोर एक असे १२ संचालक निवडून आले आहेत. तर भाजपला मानणारे सात संचालक बँकेत निवडून आलेले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला चिठ्ठीव्दारे दोन संचालक आले आहेत. सध्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतील संचालकालाच संधी मिळावी, असा सूर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे संचालक नितीन पाटील यांनी अध्यक्ष होण्यासाठीची सर्व तयारी केली आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन नितीन पाटील यांनाच अध्यक्षपदावर संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Sharad Pawar
राष्ट्रवादीला हिसका दाखवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस स्वबळावर लढणार?

तर, दुसरीकडे महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र राजपुरे यांना तर पाटणमधून सत्यजितसिंह पाटणकर यांना अध्यक्षपदावर संधी मिळावी, अशी लेखी मागणी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नितीन पाटलांसह राजेंद्र राजपुरे, सत्यजितसिंह पाटणकर यांची नावे आघाडीवर आहेत. तर भाजपचे आमदार व विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गेल्या दोन दिवसांत भेट घेऊन दुसऱ्यांदा बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा मिळावी, अशी मागणी केली आहे. पण, पक्षातून बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच व्हावा, अशी आग्रही मागणी होत असून भाजपशी संबंधित अध्यक्ष केल्यास वेगळा संदेश आगामी काळातील निवडणुकीत जाण्याची भितीही काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

Sharad Pawar
Political News : निवडणुकीत अमित शहा काँग्रेसचा खेळ बिघडवणार

त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी अध्यक्ष पदाचा निर्णय आता दोन पवारांच्या कोर्टात टाकला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार शरद पवार यांच्याशी संपर्क करून तु्म्हीच अध्यक्ष पदाचा उमेदवार सुचवा अशी विनंती केली आहे. त्यानुसार खासदार शरद पवार आज किंवा उद्या (रविवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून अध्यक्ष पदाचे नाव निश्चित करणार आहेत. बँक पक्षविरहित ठेवण्याचा मुद्दाही यावेळेस लक्षात घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात झालेली बँकेची प्रगती लक्षात घेऊन कोणाला बँकेचा कॅप्टन करायचे हे खुद्द शरद पवारच ठरविणार असल्याचे सर्वांच्याच उत्सुकता ताणल्या आहेत.

Sharad Pawar
NCP आमदाराचा 'करेक्ट' कार्यक्रम करणारे रांजणे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजेच..

जिल्हा बँकेतील पक्षनिहाय संचालक असे : राष्ट्रवादी काँग्रेस : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, सत्यजितसिंह पाटणकर, रामभाऊ लेंभे, ऋतुजा पाटील, लहुराज जाधव. राष्ट्रवादीतील बंडखोर : प्रभाकर घार्गे. भाजपचे संचालक : खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अनिल देसाई, कांचन साळुंखे, सुरेश सावंत, ज्ञानदेव रांजणे, शिवरूपराजे खर्डेकर. शिवसेनेचे संचालक : शेखर गोरे, सुनील खत्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com