कार्यमुक्त BAMS डॉक्‍टरांना सेवेत घ्या; खासदार श्रीनिवास पाटलांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

MP Shrinivas Patil
MP Shrinivas Patilesakal

कऱ्हाड (सातारा) : आरोग्यसेवेतील एमबीबीएस (MBBS Doctors) झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नव्याने होत असलेल्या नेमणुकांसोबतच वेगळ्या गट व पदाची निर्मिती करून कार्यमुक्त केलेल्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही (BAMS Medical Officer) नेमणूक द्यावी, कोरोना काळात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्याकडे केली आहे. (MP Shrinivas Patil Demand To Get MBBS Doctors In Medical Services Satara Marathi News)

Summary

दोन वर्षांपासून कोविडच्या महामारीत काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.

दोन वर्षांपासून कोविडच्या महामारीत (Coronavirus) काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्ह्यातील काही बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासदार पाटील यांची भेट घेतली. आरोग्य सेवेत पुन्हा समाविष्ट करून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन देऊन त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती खासदार पाटील यांना केली. त्याबाबत खासदार पाटील यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना पत्र लिहिले आहे.

त्यातील माहिती : दोन वर्षांपासून कोरोना महामारीशी लढताना बीएएमएस डॉक्‍टरांनी चांगली सेवा दिली आहे. अलीकडे शासनाकडून (Government Maharashtra) बंधपत्रित एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. त्या स्वागतार्ह आहेत. मात्र, यापूर्वी नेमलेल्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. राज्यात सुमारे एक हजार 200 बीएएमएस वैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त झाले आहेत. त्या पदमुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेमणूक द्यावी. संकटकाळी दिलेल्या आरोग्य सेवेतील योगदानाची सहानुभूतीपूर्वक दखल घ्यावी. भविष्यातील संभाव्य महामारी संकटांचा विचार करता त्यांची लागणारी गरज व महत्त्व पाहून त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी. एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नव्याने होणाऱ्या नेमणुकांसोबतच वेगळा गट, पदांची निर्मिती करून कार्यमुक्त केलेल्या बीएमएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही सेवेत समाविष्ट करून घ्यावे.

MP Shrinivas Patil
'कोरोनाचा गळा आवळून त्याला एकदाचं मारून टाकावं'; शिक्षिकेने सांगितली थरारक कहाणी

भविष्यकाळात महामारीशी लढताना व शासनाच्या विविध वैद्यकीय सेवा दुर्गम भागात प्रभावीपणे राबवण्यासाठी बीएएमएस उमेदवारांचा योग्य वापर होऊ शकेल.

-श्रीनिवास पाटील, खासदार

MP Shrinivas Patil Demand To Get MBBS Doctors In Medical Services Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com