esakal | राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा नको, खासदार पाटलांच्या सक्त सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

MP Shrinivas Patil

स्त्यांची कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हायला हवीत. रस्त्यांच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा करू नका, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा नको

sakal_logo
By
सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : रस्त्यांची कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हायला हवीत. रस्त्यांच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा करू नका, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी बांधकाम विभागाच्या (Construction Department) अधिकाऱ्यांना केली. कऱ्हाड ते चिपळूण (Karad to Chiplun Road) व आदर्की ते लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या (Adarki to Lonand National Highway) कामांचा आढाव्यासाठी सातारा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सारंग पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, श्रुती नाईक, महेश तागडे, शत्रुघ्न काटकर उपस्थित होते. खासदार पाटील यांनी कऱ्हाड ते चिपळूण व आदर्की ते लोणंद मार्गाचा आढावा घेतला. (MP Shrinivas Patil Instruction The Construction Department officer About Adarki To Lonand National Highway bam92)

खासदार म्हणाले, ‘‘कऱ्हाड ते चिपळूण मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांमधून तक्रारी होत आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली पाहिजे. त्यासंदर्भातील असणाऱ्या त्रुटी दूर करून मार्गातील आवश्यक सुधारणा कराव्यात. ज्या- ज्या ठिकाणी सिमेंट कॉँक्रिटच्या रस्त्याला तडे गेले आहेत. त्याठिकाणी अपघात होण्याच्या शक्यता अधिक आहेत. त्यामुळे तेथे तातडीने दुरुस्ती करावी. याशिवाय रस्त्याच्या दरम्यान अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यात यावीत.’’ लोणंद ते आदर्की मार्गाच्या सुस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. रस्त्यांची गुणवत्ता आणि दर्जाबाबत कोणत्याही तडजोडी करू नयेत. दोन्ही कामाबाबत आसपासच्या ग्रामस्थांच्या असणाऱ्या तक्रारी सोडविल्या गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

MP Shrinivas Patil Instruction The Construction Department officer About Adarki To Lonand National Highway bam92

loading image