श्रीनिवास पाटील म्हणतात, वर्क फ्रॉम होमवाल्यांसाठी 'हे' करा

सचिन शिंदे
Monday, 13 July 2020

टेलिफोन विभाग करीत असलेल्या उपाययोजनाचा अहवाल माझ्याकडे सादर करावा, असे खासदार पाटील यांनी बीएसएनएलचे जनरल मॅनेजर राकेश कुमार यांना पत्र लिहून कळवले आहे. 
 

कऱ्हाड : कोरोनामुळे सगळीकडे वर्क फ्रॉम होमसोबत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारी इंटरनेट सेवा योग्यप्रकारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या तांत्रिक अडचणींची दखल खासदार श्रीनिवास पाटील यांनी घेतली. त्यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. काय उपाययोजना केल्या त्याचा अहवालही द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
काय सांगता! नाही नाही म्हणता...48 कोटी जमा झाले
 
कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणही सुरू आहे. या कालावधीत कऱ्हाडसह पाटण, खटाव, जावळी, सातारा, खंडाळा, महाबळेश्‍वर, वाई, कोरेगाव आदी तालुक्‍यांत अतिदुर्गम, दुर्गम भागात बीएसएनएल दूरध्वनी व मोबाईल टॉवरचे जाळे आहे. मात्र, काही वेळा ते विस्कळित होत आहे. मोबाईल व इंटरनेट वापरणाऱ्यांचे येथे प्रमाण जास्त आहे. शाळा, महाविद्यालयांचे अध्यापनही ऑनलाइन सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये मोबाईल आणि इंटरनेट रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून येत आहेत. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणतात, यामुळे एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळते; निर्णयाचा फेरविचार व्हावा

त्यामुळे तालुक्‍यातील मोबाईल टॉवरना इंटरनेट कार्यक्षम करावे. त्या सेवेचा लाभ मोबाईलधारकांना व इंटरनेट वापरकर्त्यांना मिळेल, अशी उपाययोजना करावी, अशा सूचना खासदार पाटील यांनी केल्या आहेत. त्याबाबत टेलिफोन विभाग करीत असलेल्या उपाययोजनाचा अहवाल माझ्याकडे सादर करावा, असे खासदार पाटील यांनी बीएसएनएलचे जनरल मॅनेजर राकेश कुमार यांना पत्र लिहून कळवले आहे. 

संपादन - संजय शिंदे

सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर पुढचे पाच दिवस राहणार बंद

तातडीचे काम असेल तरच झेडपीत या!, कोरोना रोखण्यासाठी नियमावली जाहीर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Shrinivas Patil Suggested BSNL Officers To Work Effeciently In Satara District