ऐन पावसात भात लावणी... खासदारांच्या उपस्थितीत

अनिल बाबर
शनिवार, 11 जुलै 2020

कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतात व्हीएसटी शक्ती पॅडी मशिनद्वारे भाताची लागवड करण्यात आली.

तांबवे (जि.सातारा) ः खासदार श्रीनिवास पाटील ऐन पावसात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसाठी नुकतेच म्होप्रे (ता. कऱ्हाड) येथील शेतकऱ्याच्या बांधावर पोचले. शासनाच्या कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आयटीसेलचे प्रमुख सारंग पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, कृषी पर्यवेक्षक अशोक कोळेकर, प्रवीण सरोदे, श्री. शेख, सरपंच तुकाराम डुबल, माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण, लक्ष्मण जाधव, पोलिस पाटील सुनीता माने, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, ""शेतकऱ्यांना शेती करण्यास कोणी शिकवत नाही. ते अनुभवातून, परंपरेने येत असते. मात्र, पिके घेण्याच्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करणे गरजेचे बनले आहे. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतीमध्ये आधुनिकता स्वीकारली पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा, आधुनिक साधनांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आधुनिक पद्धतीचे बियाणे, औषधे, गांडूळ खत, कंपोस्ट व सेंद्रिय खतांचा वापर करून टोकण पद्धत, पेरणी पद्धत, वाफे, सरींच्या विविध पद्धतींचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे. नवनवीन प्रयोग करून ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग आणि इतर कडधान्य पिकांच्या बाबतीत नवे तंत्रज्ञान शिकणे गरजेचे आहे. त्यातून उत्पन्नात वाढ व्हावी, खर्चात बचत व्हावी आणि शेतकऱ्यांना चार पैसे राहायला हवेत. शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पन्न वाढविण्यासाठी या सप्ताहात आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावे. कृषी विभागानेही नव तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना अवगत करावे.'' कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतात व्हीएसटी शक्ती पॅडी मशिनद्वारे भाताची लागवड करण्यात आली.

संपादन -  संजय शिंदे

दळणवळणाचा प्रश्‍न; तरीही पुलाकडे दुर्लक्ष

'ती' पंचायत समिती झाली 'लॉक'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Shrinivas Patil Visited Farm In Karad