खासदार पाटलांचा शेतकऱ्यांना आधार, नुकसान भरपाईसाठी घेतला पुढाकार!

हेमंत पवार
Sunday, 18 October 2020

खासदार पाटलांनी शेतकऱ्यांना आधार देत कृषी अधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा कोलमडला आहे. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे. त्याला पुन्हा उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

कऱ्हाड (जि. सातारा) : पावसाने नुकसान झालेल्या पिकांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाहणी केली. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा आधार खासदार पाटील यांनी या वेळी बळीराजाला दिला. शेती, शेतीपूरक उद्योग, पोल्ट्री फार्म, घरे यांचे पंचनामे तातडीने करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

कापील येथे कोबी आणि फ्लॉवर पिकांच्या शेतात खासदार पाटील यांनी भेट दिली. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडल अधिकारी पंडित पाटील, तलाठी सचिन कुठे, सचिन निकम व ग्रामस्थ अशोक जाधव, सचिन जाधव, सतीश माने, श्री. शिंदे व अन्य शेतकरी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, पालेभाज्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

जो बत्ती करतो गुल, तो नेता 'पावरफुल्ल'! 

या वेळी खासदार पाटील यांनी शेतकऱ्यांना आधार देत कृषी अधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा कोलमडला आहे. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे. त्याला पुन्हा उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Srinivas Patil Instructed The Officials On The Farmers Question Satara News