पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा; खासदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

हेमंत पवार
Thursday, 15 October 2020

काबाडकष्ट करून पिकवलेल्या व हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस, भात व फळबागा वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्या आहेत. शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने भाजीपाला पिके सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केल्या आहेत. सध्या खरीप पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असून, हायब्रीड, बाजरी, मका, तूर, कापूस, सोयाबीन, भुईमूग, मूग, भात, मटकी, सूर्यफूल व इतर पिके काढण्यासाठी शेतात लगबग सुरू असतानाच आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. 

काबाडकष्ट करून पिकवलेल्या व हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस, भात व फळबागा वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्या आहेत. शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने भाजीपाला पिके सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आणि महसूल कर्मचाऱ्यांना द्यावेत व अहवाल राज्य शासनास सादर करावा. शासन ठरवील त्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करता होईल, असेही खासदार पाटील यांनी कळवले आहे. 

माणला शेतकऱ्यांची धांदल; कांदा, बाजरीसह घेवड्याचे मोठे नुकसान

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Srinivas Patil Notice To District Collector Shekhar Singh Satara News