Karad News : खासदार उदयनराजेंचा इंडिया आघाडीवर आरोप

विरोधकाकडे पंतप्रधानाचा अजून चेहरा ठरलेला नाही असा आरोप करुन खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांची विस्कळीत महाविकास आघाडी आहे असा टोला लगावला.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosaleesakal

कऱ्हाड - पंतप्रधान नरेद्र मोदी सरकार हे विकासाचे सरकार आहे. विरोधकाकडे पंतप्रधानाचा अजून चेहरा ठरलेला नाही असा आरोप करुन खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांची विस्कळीत महाविकास आघाडी आहे असा टोलाही लगावला.

केंद्र सरकारने निती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भरभरून विकास निधी दिला आहे. पाटण विभाग डोंगरी विभाग आहे. या डोंगरी विभागांमध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी विकास कामातून या भागाचा कायापालट केला आहे असे सांगुण खासदार भोसले म्हणाले, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढेही विकास कामासाठी मी कमी पडणार नाही.

पंतप्रधान नरेद्र मोदी सरकार हे विकासाचे सरकार आहे. विरोधकाकडे पंतप्रधानाचा अजून चेहरा ठरलेला नाही. विरोधकांची विस्कळीत महाविकास आघाडी आहे असा टोलाही लगावला.

उदयनराजेंकडून उंडाळकरांचे कौतुक

जेष्ठ नेते (कै) विलासराव पाटील उंडाळकर यांनी कधीही मोबाईलचा वापर केला नाही. मात्र त्यांनी वाडी, वस्ती, गावा-गावातील प्रत्येक सामान्य माणूस जोडून ठेवला आहे, असे उंडाळकर यांच्या कार्याचे कौतुक करुन खासदार भोसले यांनी त्यांच्या नंतर आमचे मित्र अँड उदयसिंह पाटील यांच्या पाठीमागे काकांनी जोडलेली माणसं आजही ठामपणे सोबत आहेत ते त्यांनी केलेल्या कामाचं फलित आहे असे सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com