Satara : अक्कलेचे तारे तोडणाऱ्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची मला कीव येते - उदयनराजे

नवरात्रोत्सवात हॉरर शोसाठी ग्रेडसेपरेटर भाड्याने मिळावा, अशी मागणी केली होती.
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

नवरात्रोत्सवात हॉरर शोसाठी ग्रेडसेपरेटर भाड्याने मिळावा, अशी मागणी केली होती.

सातारा : साताऱ्यातील ग्रेडसेपरेटर (Satara Grade Separator) निरुपयोगी आहे, असे अक्कलेचे तारे तोडणाऱ्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा (Shivendrasinhraje Bhosale) नामोल्लेख टाळत फटकारले. कोणत्याही सुधारणा पचनी पडण्यास काहींना कालावधी जावा लागतो. ग्रेडसेपरेटरमुळे पोवई नाक्यावरील सुमारे ५६ टक्के वाहतूक कमी झाली आहे, असा दावाही त्यांनी केला.

ग्रेडसेपरेटरच्या कामावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंवर टीका केली होती. या टीकेला उदयनराजेंनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. उदयनराजेंनी म्हटले, की 'पोवई नाका येथे झालेले ग्रेडसेपरेटरचे काम हे या क्षेत्रातील तज्ज्ञ सी. व्ही. कांड कन्सल्टन्सी बाणेर (पुणे) यांच्या सल्ल्यानुसार व केंद्रीय मार्ग निधीतून करण्यात आले आहे. हे काम करण्यापूर्वी या परिसरातील वाहतुकीचे बारकाईने सर्व्हेक्षण केले होते. तसा ग्रेडसेपरेटर बनवण्याचा सूक्ष्म निरीक्षण अहवाल आहे. त्यामुळे ग्रेडसेपरेटर एक निरुपयोगी आहे, असे अक्कलेचे तारे तोडणाऱ्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते.'

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Shiv Sena : वंचित बहुजन आघाडीला मोठं खिंडार; प्रकाश आंबेडकरांवर टीका करत राठोडांनी बांधलं 'शिवबंधन'

नितीन गडकरींकडून ग्रेडसेपरेटर कामाला मंजुरी

ग्रेडसेपरेटरची आवश्यकता जाणून केंद्रीय मार्ग निधीतून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून हा ग्रेडसेपरेटर उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. सर्वेक्षणामध्ये पोवई नाका येथे १२ हजार २३७ सर्व प्रकारची वाहने व प्रतिमिनिटाला १८५ इतक्या संख्येने वाहने जात होती, असा निष्कर्ष नोंदविला आहे. या ठिकाणी आठ रस्ते एकत्र येत असल्याने आयआरसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रेडसेपरेटरचे डिझाईन तयार करण्यात आलेले आहे. ग्रेडसेपरेटरपूर्वी पोवई नाक्यावरून दिवसभरात एसटीच्या तीन हजार २२६ फेऱ्या ये-जा करीत होत्या. या वाहनांचा पडणारा मोठा भार आज कमी झाला आहे. त्यामुळे इंधन आणि प्रवासाची बचत झाली आहे. ग्रेडसेपरेटर झाल्यामुळे निरीक्षण निष्कर्षानुसार पोवई नाक्यावरील सुमारे ५६ टक्के वाहतूक कमी झाली आहे. आजही ग्रेडसेपरेटरचा वापर गरज असणारे करीत आहेत. त्यामुळेच सर्व तांत्रिक बाजूंचा या विषयात तज्ज्ञ असणाऱ्यांनी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अभियंत्यांच्या देखरेखीखाली ग्रेडसेपरेटर उभारण्यात आला आहे.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Kolhapur : 'राजाराम'च्या सभेत ठराव मांडताना पाटील-महाडिक गट एकमेकांना भिडले; दोन्ही गटांत बाचाबाची

'सज्ञान व्यक्तींच्या प्रगल्भ विचारांची कीव वाटते'

आता कोणी तरी आगंतुकाने उठावे आणि ग्रेडसेपरेटर बिनकामाचा आहे, असे म्हणावे किंवा ग्रेडसेपरेटरमध्ये ‘हॉरर शो’च्या आयोजनास परवानगी मागितलेल्या अज्ञानी; परंतु सज्ञान व्यक्तींच्या प्रगल्भ विचारांची कीव वाटते. यानिमित्ताने संबंधितांची वैचारिक दिवाळखोरी जनतेसमोर आली आहे.

- उदयनराजे भोसले, खासदार

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Congress : अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट? 'या' दोन दिग्गज नेत्यांत 'कांटे की टक्कर'

काय म्हणाले शिवेंद्रसिंहराजे?

बोटावर मोजण्याइतके लोक साताऱ्यातील ग्रेडसेपरेटरमधून जात आहेत. त्यामुळे मी करतोय, तेच योग्य करतोय, या ‘त्यांच्या’ लहरीपणातून हे काम झाले असून, त्यातूनच हा ग्रेडसेपरेटरचा प्रकल्प सातारकरांच्या माथी मारला आहे. संकल्पक म्हणून नाव लावून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे. या प्रकल्पामुळे सातारकरांचा पैसा वाया गेला आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून काल केली. सातारा शहरातील बालगोपाल मित्र मंडळाने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन नवरात्रोत्सवात हॉरर शोसाठी ग्रेडसेपरेटर भाड्याने मिळावा, अशी मागणी केली होती. या मुद्द्यावर शिवेंद्रसिंहराजेंना पत्रकारांनी विचारले. यावेळी खासदार उदयनराजेंचा नामोल्लेख टाळत त्यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam latest water storage update
From Legacy to Leadership: Utkarsha Jadhav Shines as Police Academy’s Star Cadet
Heartbreaking farewell to brave soldier Arjun Jadhav in rural Maharashtra village
Administrative Apathy Hits Healthcare Services; Health Committee Activities at Standstill
Marathi News Esakal
www.esakal.com