फेरीवाल्यांना पालिका देणार प्रत्येकी हजार रुपये; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना प्रत्युत्तर

फेरीवाल्यांच्या धोरणावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेवर टीका केली होती.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal

सातारा : साताऱ्यातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण यापूर्वीच झालेले आहे. फेरीवाल्यांप्रती सहानुभूती दाखवत टीका करणाऱ्यांनी याची थोडी माहिती घेतली असती, तर वस्तुस्थिती त्यांना समजली असती. कोरोनाच्या परिस्थिती भीषण असून, त्यात अकारण संभ्रमावस्था निर्माण करण्यापेक्षा संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करत खासदार उदयनराजे भोसले यांनी फेरीवाल्यांना लाभ दिले असून, राज्य शासनाच्या रकमेत पालिका स्वत:चे हजार रुपये जमा करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

फेरीवाल्यांच्या धोरणावरून काल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेवर टीका केली होती. यास उत्तर देण्यासाठी काढलेल्या पत्रकात उदयनराजेंनी म्हटले आहे, की सातारा नगरपालिका आणि फेरीवाला संघटनेने एक हजार 621 पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानंतर पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतून 754 पथविक्रेत्यांचे खात्यात 10 हजार जमा झाले, तर उर्वरितांची प्रकरणे प्रलंबित आहेत.

याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत सुद्धा वितरित होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत टीका करणाऱ्यांना नीट माहिती मिळाली असती तर त्यांनी अशी टीका केली नसती, असा टोलाही त्यांनी पत्रकात नाव न घेता शिवेंद्रसिंहराजेंना लगावला आहे. राज्य शासनाच्या रकमेत पालिका स्वत:चे हजार रुपये जमा करणार असून, त्यासाठीचा निर्णय पालिकास्तरावर घेतल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com