Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal

VIDEO : नाद नाही राजेंचा करायचा..; कॉलर उडवत उदयनराजेंचा जबराट डान्स

Summary

खासदार उदयनराजे भोसले आज पुन्हा एकदा 'कॉलर' उडवून चाहत्यांना खूश केलंय.

सातारा : वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आज पुन्हा एकदा 'कॉलर' उडवून चाहत्यांना खूश केलंय. शहरातील वॉर्डामध्ये विकासकामांच्या निमित्तानं उदयनराजे यांचा जोरदार राबता सुरूय. मंगळवारी एका वॉर्डात नाद नाही राजेंचा करायचा... हे गाणं लावण्यात आलं. यावेळी उदयनराजेंनी आपली कॉलर उडवत कार्यकर्त्यांसोबत जोरदार डान्स केला.

उदयनराजे हे साताराच (Satara) नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो. युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजे यांनी उगारलेले बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कस ग सांगू.. हे म्हणलेले गाणे, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचे नेहमी सर्वांना आकर्षण असते. चारचाकी इतकेच त्यांना दुचाकी वेगात चालविण्याची प्रचंड आवड आहे.

Udayanraje Bhosale
जीना यहाँ मरना यहाँ.. गाण गाऊन 'या' काँग्रेस नेत्यानं दिले राजकीय संकेत

खासदार उदयनराजेंची कॉलर उडविण्याची स्टाईल सगळ्यांनाच माहितीय. जाहीर कार्यक्रमांत आणि भर सभेत कॉलर उडवून विरोधकांना आव्हान देणारे उदयनराजे आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे. परंतु, मंगळवारी रात्री विकासकामांच्या निमित्तानं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी उदयनराजेंनी ही स्टाईल केल्याने कार्यकर्त्यांनी शिट्ट्या फुंकल्या. तसेच कार्यकर्त्यांसोबत उदयनराजे नाद नाय करायचा... या गाण्यावर थिरकल्याचे पहायला मिळाले. गेले काही दिवस उदयनराजे हे सातारा येथील विविध विकासकामे मार्गी लावत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com