साताऱ्यात उदयनराजेंचा हटके अंदाज; जिप्सी रायडिंग अन् गाण्यावर अफलातून ठेका..

बाळकृष्ण मधाळे
Wednesday, 25 November 2020

उदयनराजे त्यांच्या हटके अंदाजामुळे तरुणाईत भलतेच 'फेमस' आहेत. आताही त्यांनी जिप्सीसोबत आपला हटके अंदाज पुन्हा एकदा दाखवला आहे. टोपी आणि गॉगल घालून उदयनराजेंनी आपली स्टाईल स्पेशल असल्याचचं दाखवून दिलं आहे.

सातारा : खासदार उदयनराजेंचा हटके अंदाज तरुणाईला नेहमीच भुरळ पाडत असतो. उदयनराजे कुठेही गेली तरी तरुणाईचा त्यांच्यासमोर गराडा असतोच असतो. कधी सेल्फी घेण्यासाठी, तर कधी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी. उदयनराजे त्यांच्या हटके अंदाजामुळे तरुणाईत भलतेच 'फेमस' आहेत. आताही त्यांनी जिप्सीसोबत आपला हटके अंदाज पुन्हा एकदा दाखवला आहे. टोपी आणि गॉगल घालून उदयनराजेंनी आपली स्टाईल स्पेशल असल्याचचं दाखवून दिलं आहे.

खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईलसाठी आणि रोखठोक स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. आपले छंद जोपासताना ते कधीही कोण काय म्हणेल याचा विचारत करत बसत नाहीत. सोशल मीडियावर त्यांचे रायडिंगचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. दुचाकी असो अथवा चारचाकी गाडी...उदयनराजे हे आपल्या नेहमीच्याच शैलीत साताऱ्यात पाहायला मिळतात. सातारकरांना आजही उदयनराजेंच्या याच हटके स्टाईलचा पुन्हा एकदा अनुभव आला आहे. आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी ते स्वतः MIDC येथील गॅरेजमध्ये आले होते. जिप्सी गाडी मनासारखी दुरुस्त केली आहे की नाही, हे पाहण्यासाठी ते स्वतः गॅरेजमध्ये आले. गाडीमध्ये बसताच डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर गॉगल लावत गाडीच्या सायलेन्सरचा मोठा आवाज करत उदयनराजेंनी गाण्यावर ठेका धरला आणि धूम स्टाईलने गाडी चालवत शहरात फेरफटका मारला.

आमदारांचा अनोखा अंदाज! कार्यकर्त्यांच्या गराड्यातून शिवेंद्रसिंहराजे पोहचले थेट शेतात!

उदयनराजेंना बाईक सवारी करणे अधिक पसंत असून त्यांनी वेळोवेळी याची प्रचिती दिली आहे. मात्र, आज त्यांनी जिप्सी गाडीवरती रपेट मारत शहराची सफर केली. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजेंची बुलेट सवारी करत आपला खासदारकीचा उमेदवारी अर्ज भरला होता. याची समाज माध्यमांवर खूपच चर्चा झाली. उदयनराजेंच्या गाडीचा 007 हा नंबर तर तरुणाच्या मनामनांत पहाला मिळत असून अनेकांनी आपल्या गाडीवरती हा क्रमांक उतरवून, एकच साहेब महाराज साहेब अशा प्रकारचे स्लोगन बनवले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Udayanraje Bhosale Drove A Gypsy Car In Satara