साताऱ्यातील उपकेंद्रासाठी सहकार्य करू; उदयनराजेंचं कुलगुरूंना आश्वासन

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Summary

शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) सातारा येथील नियोजित उपकेंद्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) सातारा येथील नियोजित उपकेंद्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी येथे दिली. आज (ता. १२) सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपकेंद्राच्या जागेसाठीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. खासदार भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीत ते बोलत होते.

श्री. भोसले म्हणाले, ‘‘केवळ आर्थिक आणि भौगोलिक कारणांनी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करवून घेण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर विद्यापीठाचे उपकेंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. गावाकडून मोठ्या शहरांकडे होणारे विद्यार्थ्यांचे, कामगारांचे स्थलांतर रोखणे आणि त्यांना स्थानिक पातळीवर विविध उद्योग-व्यवसाय, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.’’ डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘विद्यापीठाची उपकेंद्रे, उपपरिसर निर्माण करत असताना त्या ठिकाणी आम्हाला केवळ ‘आणखी एक महाविद्यालय अगर विद्यापीठाचे विस्तारित स्वरूप’ अभिप्रेत नाही. स्थानिक संसाधने, तेथील भौगोलिक वैशिष्ट्ये यांचा समावेश करून त्यांची नव्या शैक्षणिक धोरणाशी सांगड घालायची आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक वैशिष्ट्यांची रोजगाराभिमुखता प्रदान करून संपन्न व समृद्ध बनविणारे अभ्यासक्रम अपेक्षित आहे.’’

Udayanraje Bhosale
जे पेरले तेच उगवले; अजित पवारांवर उदयनराजेंचे टीकास्त्र

या प्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी विद्यापीठाने सातारा येथे उपकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने चालविलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सुरुवातीला प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. अधिसभा सदस्य डी. जी. बनकर, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, उपकुलसचिव वैभव ढेरे उपस्थित होते.

Udayanraje Bhosale
शेतकऱ्यांना मदतीची राज्य शासनाला सुबुद्धी दे, उदयनराजेंचं अंबाबाईला साकडं

कामगार नको उद्योजक बना

शहरांमध्ये जाऊन कामगार होण्यापेक्षा स्थानिक पातळीवर स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारून मालक होण्यासाठी युवकांना मदत करण्याचे धोरण यामध्ये अंतर्भूत आहे. त्याअंतर्गत आवश्यक पायाभूत सोईसुविधा स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात येतील. विद्यापीठाने उपकेंद्रासाठी काय हवे, ते सांगावे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार भोसले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com