esakal | कबड्डीपटूची स्वप्न पाहणाऱ्या मुलीच्या हत्येनं मान शरमेनं खाली; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप I Udayanraje Bhosale
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale
पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील घटनेचा खासदार उदयनराजेंनी संताप व्यक्त करत निषेध नोंदविलाय.

'कबड्डीपटूची स्वप्न पाहणाऱ्या मुलीच्या हत्येनं मान शरमेनं खाली'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात (Pune Bibwewadi Area) अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत (Kabaddi Player) असताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना मन हेलावून टाकणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं, हे अतिशय निंदनीय व सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असल्याची भावना खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी फेसबुक पोस्टव्दारे व्यक्त केलीय.

या घटनेचा खासदार उदयनराजेंनी संताप व्यक्त करत निषेधही नोंदविलाय. ते पुढे म्हणाले, शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेलीय. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं, हे अतिशय निंदनीय असून आम्ही मुलीच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: सगळी नौटंकी सुरू आहे, म्हणून दुचाकीवरुन फिरावं लागतंय

पुण्यातील 14 वर्षीय कबड्डीपटूच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन मुलीची कोयत्याने हत्या करुन आरोपी लपून बसला होता. या हत्याकांडानं पुण्यातच नाही, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाची दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. अखेर 12 तासांच्या आतच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा: 'त्यांना'च शिव्या देतो अन् त्यांच्याशी चर्चा करायला जातो : शिवेंद्रसिंहराजे

loading image
go to top