शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री पाेहचले उदयनराजे; नोंदविली तक्रार

शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री पाेहचले उदयनराजे; नोंदविली तक्रार
Updated on

सातारा : जलमंदिर पॅलेसमधील शयन कक्षाच्या प्रवेशद्वारावर लावलेली एक लाख चार हजार रुपये किमतीची चांदीची शोभेची बंदूक चोरणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. दीपक पोपट सुतार (रा. माची पेठ) असे त्याचे नाव आहे.

याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या जलमंदिर पॅलेसमधील शयन कक्षाच्या प्रवेशद्वारावर एका काचेच्या पेटीमध्ये सुमारे दोन ते अडीच किलो वजनाची सुमारे एक लाख चार हजार रुपये किमतीची चांदीची शोभेची बंदूक लावलेली होती.

पक्ष्यांच्या किलबिलाटासाठी इस्लामपूरच्या शिक्षकाची धडपड

साेमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने या पेटीतून ही बंदूक लंपास केली होती. ही गोष्ट निदर्शनास आल्यावर उदयनराजे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री पावणेदहाच्या सुमारास फिर्याद नोंदविली. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी तातडीने तपास प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये सुतार याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीला गेलेली बंदूक हस्तगत करण्यात आली आहे. हवालदार फडतरे तपास करत आहेत.

उदयनराजेंच्या जलमंदिरात चांदीच्या बंदुकीची चोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com