इनोव्हेटिव्ह साताराविषयी खासदार उदयनराजेंच्‍या सूचना

इनोव्हेटिव्ह साताराविषयी जलमंदिर येथे आज झालेल्‍या आढावा बैठकीत उदयनराजे बोलत होते.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

इनोव्हेटिव्ह साताराविषयी जलमंदिर येथे आज झालेल्‍या आढावा बैठकीत उदयनराजे बोलत होते.

सातारा - वाढे फाटा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, शिवराज चौक शहराची प्रवेशद्वारे आहे. ठिकाणच्या उड्डाणपुलाखालील राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) जागेत महानगरांच्‍या धर्तीवर, बागबगीचा, वॉकिंग ट्रॅक, व्हर्टिकल गार्डन, भाजी मंडई, पार्किंग, आर्टिफिशियल वॉटरफॉल, फाउंटन्स्, सार्वजनिक स्वच्छतागृह आदी सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न इनोव्हेटिव्ह साताराच्या (Innovative Satara) माध्यमातून सुरू आहे. हा भाग पालिकेत आल्‍याने पालिकेने भविष्यकालीन विचार करून पुढाकार घेत तसे प्रस्‍ताव शासनाकडे देण्‍याच्‍या सूचना सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिल्या.

Udayanraje Bhosale
सातारा : झेडपी’, पंचायत समितीतील २८१ जणांना कोरोनाची बाधा

इनोव्हेटिव्ह साताराविषयी जलमंदिर येथे आज झालेल्‍या आढावा बैठकीत उदयनराजे बोलत होते. अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट आणि वाढे फाटा चौक येथील उड्डाण पुलाखाली मोठी जागा उपलब्ध आहे. या जागेमध्ये कोणतेही अवैध उद्योग होऊ नयेत आणि जागेचा सुयोग्य वापर लोकोपयोगी कामामध्ये होण्यासाठी आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास यापूर्वी वेळोवेळी विविध प्रस्ताव सुचविलेले आहेत. तथापि, या पुलाखालील जागा हस्तांतरणास तयार असल्‍याचे महामार्ग प्राधिकरणाने कळवले आहे. हा भाग पालिकेत आला असून, येथे चांगले उपक्रम राबविणे आवश्‍‍यक आहे. त्यासाठी आर्किटेक्ट असोसिएशनकडून प्रकल्प चित्र तयार करून घेण्‍याच्‍या सूचनाही उदयनराजेंनी दिल्‍या. शहरानजीकच्‍या महामार्गांच्या पुलांची स्वच्छता, सर्व्हिस रोडवरील गटार स्वच्छता आणि साफसफाई आणि स्ट्रीट लाइट तातडीने सुरू करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाला केल्‍याचेही त्‍यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com