सातारा : सैनिकांच्या वेशात येऊन, नरसंहार घडवून आणणारी पहलगाम येथील घटना, मानवतेला गिळंकृत करणारी व भारताच्या अखंड सार्वभौमत्वाला आव्हान देणारी आहे. निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांना (Pahalgam Terror Attack) वेचून त्यांची पाळेमुळे खणून काढत त्यांचा बिमोड करण्याची मागणी करणारी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे नोंदवली आहे.