
गेल्या काही वर्षांपासून कवठे परिसरातील ट्रान्स्फॉर्मर फोडून ऑइल व तांब्याच्या तारा चोरण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. पोलिसांनी या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कवठे (जि. सातारा) : वेळे (ता. वाई) हद्दीतील कोपीचा माळ, सुरूर (ता. वाई) हद्दीतील हेळा शिवार व पवार वस्ती असे महावितरणचे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून, त्यातील ऑइल व तांब्याच्या तारा चोरून नेल्या. या तोडफोडीने महावितरणचे सुमारे दहा ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोपीचा माळ, वेळे (ता.वाई) व चव्हाण, सुरूर (ता. वाई) अशा तीन ठिकाणच्या ट्रान्स्फॉर्मरवरील शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद करून अज्ञात चोरट्यांच्या टोळीने ट्रान्स्फॉर्मरची तोडफोड केली. ट्रान्स्फॉर्मरवरील लोखंडी व विजेचे साहित्य अस्ताव्यस्त टाकून त्यातील ऑइल व तांब्याच्या तारा चोरून नेल्या. यामुळे महावितरणचे सुमारे दहा ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तसेच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरीची भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या चोऱ्यांमुळे वीज जावून शेतकऱ्यांचे, तर ट्रान्स्फॉर्मरची तोडफोड होऊन साहित्य जात असल्याने महावितरणचेही मोठे नुकसान होत आहे. या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांबरोबरच महावितरणचे कर्मचारीही चांगलेच त्रासून गेले आहेत. या चोऱ्यांच्या प्रकारामुळे कवठे परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून कवठे परिसरातील ट्रान्स्फॉर्मर फोडून ऑइल व तांब्याच्या तारा चोरण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. पोलिसांनी या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
ना नफा ना तोटा या तत्त्वावर शाळा सुरु ठेवा; फी वाढ करू नका
औंधमध्ये उद्यापासून जमावबंदी; यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण आदेश
स्कूल चले हम! पाठीवर दप्तर, खांद्यावर हात टाकत बालमित्र पाेचले शाळेत
Edited By : Siddharth Latkar