esakal | कोकणच्या मदतीला धावले खटावकर; 'महावितरण'कडून सिंधुदुर्गात 24 तास वीज जोडणीचे काम
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL Officials

सिंधुदुर्ग भागांत ठिकठिकाणी वीजवाहक खांब उखडून पडले, विद्युतवाहक ताराही तुटल्या. त्यामुळे या भागांतील विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे.

कोकणच्या मदतीला धावले खटावकर; 'महावितरण'कडून सिंधुदुर्गात 24 तास वीज जोडणीचे काम

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) बसलेला तडाखा व त्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी खटाव तालुक्‍यातील वीज वितरण कंपनीचे (MSEDCL) अधिकारी, कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. हे कर्मचारी सध्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. (MSEDCL Officials From Khatav Taluka Helped In Konkan Area Satara Marathi News)

या भागांत ठिकठिकाणी वीजवाहक खांबही उखडून पडले, विद्युतवाहक ताराही तुटल्या. त्यामुळे या भागांतील विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. तो पूर्ववत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे बारामती मंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, साताऱ्याचे अधीक्षक अभियंता श्री. गायकवाड, वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हणमंतराव ढोक यांच्या आदेशानुसार वडूज विभागातील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता ज्ञानेश्वर करे (औंध उपविभाग), प्रधान तंत्रज्ञ सुनील गडकरी (निमसोड शाखा), सोमेश्वर सूर्यवंशी (औंध शाखा), वरिष्ठ तंत्रज्ञ राहुल जाधव (बुध शाखा), तंत्रज्ञ ऋषिकेश खुडे (दहिवडी शाखा), उमेश इंगळे या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक काम करीत आहे.

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) विभागातील आचरा बंदर, रामगड, बुधवळे, पांडलोस, मठबिंदू, लोहरवाडी, नारलवाडी आदी भागांत वीज जोडणीचे सकाळी आठ-नऊ वाजल्यापासून ते रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत बारा तास हे सर्वजण काम करीत आहेत. विजेचे खांब उभे करणे, वीज वाहक तारांची जोडणी आदी कामे ही डोंगराळ व दुर्गम भागांत जाऊनच करावी लागत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी सकाळी लवकर उठून या मदत कार्याला सुरवात करीत असून, रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू असते.

हेही वाचा: 'असा निर्णय घेणारे माेदी हे जगातील एकमेव पंतप्रधान ठरले असतील'

घरच्यांशीही 24 तास संपर्काविना

कोकणातील बहुतांशी भाग हा डोंगराळ व दुर्गम असल्याने अनेक भागांत मोबाईलचे नेटवर्क येत नाही. त्यामुळे घरच्या मंडळींशीही तब्बल 24 तास संपर्क होऊ शकत नाही. कामानिमित्त एखाद्या डोंगरावर अथवा उंचवट्याच्या ठिकाणी गेल्यावर त्याठिकाणी मोबाईलला नेटवर्क आल्यानंतरच घरच्यांशी संपर्क होतो. त्यावेळी एकमेकांच्या ख्याली खुशालीची चर्चा होते, असे प्रधान तंत्रज्ञ सुनील गडकरी यांनी सांगितले.

शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रश्नावर उदयनराजे घेतील निर्णय?

MSEDCL Officials From Khatav Taluka Helped In Konkan Area Satara Marathi News