Satara : महावितरण कामगार युनियनचे आजपासून दुचाकी वाहन बंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

Satara : महावितरण कामगार युनियनचे आजपासून दुचाकी वाहन बंद आंदोलन

कोपर्डे हवेली : महावितरणच्या तांत्रिक कामगारांना वाढीव इंधन भत्ता देण्याचे मान्य केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनतर्फे (उद्या) २७ सप्टेंबर पासून काम बंद आंदोलनाचा भाग म्हणून दुचाकी वाहन बंद आंदोलन केले जाणार आहे. यावेळी कामगार आपल्या मागण्यांचे निवेदन अधिकार्‍यांना सादर करणार आहेत.

महावितरणचा तांत्रिक कामगार फिल्डवर काम करताना विविध प्रकारची कामे करत ग्राहकांना सेवा देताना स्वतःचे दुचाकी वाहन वापरत असून पेट्रोलसाठी स्वतः खर्च करीत आहे. रोज किमान एक लिटर पेट्रोल काम करताना लागते. ही बाब महावितरणाच्या त्या त्या वेळच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या लक्षात आणून दिली होती. जे जे आय. ए. एस. अधिकारी महावितरणला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणुन लाभले त्यांनी एकदाही या मागणीला नाही म्हटलं नाही. त्या २०१८ चा वेतन वाढीचा करार होताना तांत्रिक कामगारांना वाढीव इंधन भत्ता देण्याचा निर्णय झाला देखील. जानेवारी २०२० पासून याची अंमलबजावणी करण्याचे मान्य झाले आहे, मात्र अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने तांत्रिक कामगारांनी यापूर्वी वारंवार आक्रमक पवित्रा निदर्शन, काळ्या फित लावून आंदोलन केले आहे.

हेही वाचा: वरळी-कलानगर सोडून मुंबईच अस्तित्व शिवसेनेला मान्य आहे? - भाजपा

उद्यापासून हे कामगार कार्यालयापर्यंत दुचाकी वाहन नेऊन तेथेच लावून दुचाकी वाहन बंद आंदोलन करणार आहेत. ज्या काही सेवा द्यायच्या असतील त्या स्वतःचे वाहन न वापरता, चालत किंवा शाखा अभियंता जे वाहन इंधनासह देतील ते वापरून देतील. जोपर्यंत वाढीव इंधन भत्ता दिला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन होणार आहे. पुढे चारही प्रादेशिक कार्यालये आणि आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

Web Title: Msedcl Workers Union Stops Two Wheeler Agitation Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraMSEDCL