

MSRTC
esakal
कऱ्हाड - एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डधारक प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आता कार्डमध्ये केवळ पाच रुपयांचे टॉपअप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी किमान ५० रुपयांचे टॉपअप करणे आवश्यक होते. ही अट रद्द करून प्रवाशांना मोठा दिलासा एसटी महामंडळाने दिला आहे.