मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीसह कॉंग्रेसची फिल्डिंग

उमेश बांबरे
Monday, 24 August 2020

येत्या 31 तारखेला ही निवड होईल. त्यासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या गोटातून अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.

सातारा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 31 ऑगस्टला या निवडी बाजार समितीत होणार आहेत. या पदासाठी साताऱ्याचे संचालक बाळासाहेब सोळसकर यांच्यासह नागपुरातील तिघांची नावे चर्चेत आहेत.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणाच्या नावाला पसंती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. साताऱ्यातून कोरेगाव बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर हे मुंबई बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून गेले आहेत. या समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात महाबळेश्‍वरला नववे स्थान, कचरामुक्तीत थ्री स्टार मानांकन

कोयना धरणग्रस्तांच्या गावागावांत जल्लोष ; महत्त्वपूर्ण प्रश्न सुटला 

येत्या 31 तारखेला ही निवड होईल. त्यासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या गोटातून अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. काही संचालकांनी बाळासाहेब सोळसकर यांच्या नावाची शिफारस शरद पवार यांच्याकडे केली आहे. नागपूरमधील दोन संचालकांची नावेही आघाडीवर आहेत.

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवा- राज्य अपंग कर्मचारी संघटना

नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या रानभाज्या पर्वणीच : कांचनमाला निंबाळकर

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Market Committee Chairman Election On 31 August