शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाने उदयनराजे गटाकडे सातारकरांसाठी धरला आग्रह

शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाने उदयनराजे गटाकडे सातारकरांसाठी धरला आग्रह
Updated on

सातारा : लॉकडाउनच्या काळातील सरसकट सर्वांची तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव सातारा पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत नुकताच मंजूर करण्यात आला. या विषयाबरोबरच इतर 40 विषय मंजूर करत कोरोना कालावधीतील साहित्य खरेदीच्या कार्योत्तर मंजुरीचा विषय सभागृहाने तहकूब केला. सातारा पालिकेची सर्वसाधारण ऑनलाइन सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेसाठी सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद निशांत पाटील, ऍड. दत्ता बनकर व इतर दोन-चार, तर नगरविकास आघाडीचे बहुतांश नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. 

कोरोना काळातील लॉकडाउनमुळे पालिका हद्दीतील व्यावसायिकांना तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा विषयही सभेपुढे होता. या विषयावर अशोक मोने, अमोल मोहिते यांनी उपसूचना मांडत सरसकट सर्वांच्या घरपट्टी माफीची मागणी केली. त्यावर ऍड. बनकर व इतरांनी मते मांडली. त्यानंतर पालिका हद्दीतील सर्वच मिळकतधारकांची तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याची सुधारणा विषयात करत ठराव मंजूर केला. हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. 

मी इथं बरा आहे शिवेंद्रसिंहराजे

सभेआधी विकासकामे मार्गी लावल्याबद्दल "नविआ'ने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या, तर "साविआ'ने खासदार उदयनराजे भोसलेंच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. हे दोन्ही ठराव मंजूर केल्यानंतर पत्रिकेवरील विषयांचे वाचन करत ते मंजूर करण्याचा सपाटा सुरू झाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तातडीच्या साहित्य खरेदीच्या कार्योत्तर मंजुरीच्या विषयाला "साविआ', "नविआ'च्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. पत्रिकेतील विषयाच्या टिपण्या सादर करण्याची मागणी अशोक मोने, वसंत लेले, अमोल मोहिते, अविनाश कदम व इतरांनी केली. त्यानुसार नगराध्यक्षांनी तसे आदेश दिले. मात्र, सभेसाठी आरोग्य विभागाचे सुहास पवार गैरहजर होते. त्याची विचारणा मुख्याधिकाऱ्यांकडे झाली. पवार यांचा रजेचा अर्ज नसल्याची माहिती त्यांनी सभागृहास दिली. टिपण्या नसल्याने तसेच अधिकारी नसल्याने तो विषय तहकूब करण्याची तसेच पवार यांच्यावर कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली. त्यानुसार माधवी कदम यांनी पवार यांच्या चौकशीचे आदेश पालिका प्रशासनास दिले. कोरोना कालावधीत खरेदी केलेल्या 500 फेसमास्कचे वाटप झाले नसून त्या व इतर साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वसंत लेवे यांनी केले. आरोप करतानाच त्यांनी साहित्य खरेदीतील भ्रष्टाचारात प्रशासनाचे हात असल्याचा आरोप केला. 

शरद पवारांच्या आदेशानेच सातारा-जावळीत हस्तक्षेप; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रसिंहराजेंना चोख प्रत्युत्तर

"साविआ' ऑनलाइन; तर "नविआ' ऑफलाइन 

ऑनलाइन सभेच्या कामकाजात ऑफलाइन सहभागी होण्यासाठी "नविआ'चे बहुतांश नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. "नविआ'च्या नगरसेवकांमुळे नंतर "साविआ'च्या काही नगरसेवकांनाही सभागृहात हजर राहण्याच्या सूचना झाल्या. ऑनलाइन सभा असताना सभागृहात उपस्थित राहायची गरज होती का, असा सवाल करत निशांत पाटील यांनी मत मांडणे सुरू केले. त्यावरून त्यांच्यात आणि बाळासाहेब खंदारे यांच्यात वादावादी झाली. 

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार?

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com