Karad News : रणांगण पालिकेचे... लक्ष्य जिल्हा बँकेचे; कऱ्हाडला भाजपकडून ‘लोकशाही’ टार्गेट

कऱ्हाडच्या राजकारणात कृष्णा कारखाना निवडणुकीने अनेक पारंपरिक राजकीय समीकरणांना दिला धक्का.
satara politics

satara politics

sakal

Updated on

- सचिन शिंदे

कऱ्हाड - येथील पालिकेच्या मासिक सभेतील गोंधळावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता व्यापक राजकीय संदर्भ मिळाला आहे. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी भाजपला लक्ष्य केल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेत थेट लोकशाही आघाडीवर निशाणा साधला. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाशी संबंधित राजकीय प्रभावावर भाजपने केलेल्या टीकेमुळे पालिकेतील संघर्ष आता स्थानिक राजकारणापलीकडे गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com