esakal | सातारा जिल्ह्यातील 'ही' पालिका आत्मनिर्भर निधी योजनेतून देतेय कर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

karad corporation

कोरोना व लॉकडाउनच्या काळात अत्यंत हलाखीच्या स्थितीत गेलेल्या पथ विक्रेत्यांना सावरण्यासाठी पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पतपुरवठा सुरू आहे. शहरातील पथ विक्रेत्यांना निधी देण्यास येथील पालिकेने प्रारंभ केला. त्या योजनेचा लाभ पथ विक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

सातारा जिल्ह्यातील 'ही' पालिका आत्मनिर्भर निधी योजनेतून देतेय कर्ज

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : कोरोना व लॉकडाउनच्या काळात अत्यंत हलाखीच्या स्थितीत गेलेल्या पथ विक्रेत्यांना सावरण्यासाठी पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पतपुरवठा सुरू आहे. शहरातील पथ विक्रेत्यांना निधी देण्यास येथील पालिकेने प्रारंभ केला. त्या योजनेचा लाभ पथ विक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
 
परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयापर्यंत विनातारण खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातर्फे योजना राबवली जाणार आहे. 24 मार्च 2020 रोजी आणि त्यापूर्वीच्या शहरातील व शहराबाहेरील स्थिर व फिरते फेरीवाल्यांना त्याचा लाभ होणार आहे. पालिकेने दिलेले विक्री प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याशिवाय पालिकेने केलेल्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात आढळलेले मात्र ओळखपत्र, विक्री प्रमाणपत्र न दिलेले अशा विक्रेत्यांनाही कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षणातून वगळले आहे किंवा सर्वेक्षणानंतर ज्यांनी विक्री व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यांच्यासह पालिकेच्या शहर फेरीवाला समितीने शिफारस पत्र जारी केलेला आहे. त्या विक्रेत्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
 
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्र यादव, महिला बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी योजनेची माहिती घेऊन मार्गदर्शन केले आहे. नियोजन सभापती वाटेगावकर व महिला बालकल्याण सभापती हुलवान यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप झाले. त्या योजनेचा लाभ जास्तीतजास्त पथ विक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे. प्रीतम यादव, सुशांत ढेकळे, बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी ज्ञानेश्वर धडाडे, शहर पथ विक्रेता संघटनेचे पदाधिकारी, जावेद नायकवडी, क्रांती मोरे, गजेंद्र कुंभार उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top