
कलेढोण : येथील बेघरवस्तीतील रस्त्यालगतच्या राहत्या घरामध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी संशयित पती संतोष सखाराम जाधव (वय ४५) यास पोलिसांनी इस्लामपूर-वाळवा रोड (जि. सांगली) येथून आज सकाळीच ताब्यात घेतले. मंगल ऊर्फ सुमन संतोष जाधव (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. काल रात्री ही घटना घडली असून, आज सकाळी हा प्रकार समोर आला. सुमन यांचा भाऊ परशुराम वसंत माने यांनी मायणी पोलिस ठाण्यात खुनाची फिर्याद दिली आहे.