Satara : राष्ट्रवादीला धक्का; सेनेच्या महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंना रोखलं

Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on: 
Summary

कोरेगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीला धक्का बसला असून इथं शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्या पॅनेलनं सत्ता मिळवली आहे.

सातारा - कोरोगाव नगरपंचायतीत शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनं बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसला असून राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला चार जागा मिळवता आल्या.

कोरेगाव नगरपंचायत - सर्व १७ जागांची मतमोजणी पूर्ण, १३ जागा कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलला आणि चार जागा राष्ट्रवादी पॅनेलला मिळाल्या आहेत. कोरेगाव नगरपंचायतीत सत्तांतर झालं आहे. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात सत्ता.

खंडाळा नगरपंचायतीत पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादीने चार तर भाजपने २ जागा जिंकल्या आहेत. प्रभाग दोन मध्ये केवळ दोन मतांनी राष्ट्रवादी विजयी. तर प्रभाग चार मध्ये केवळ तीन मतांनी भाजपा विजयी

लोणंद - नगरपंचायतीचे निकालही हाती आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ९ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसनं ३, भाजपने ३ जागा मिळवल्या आहेत. अपक्ष उमेदवाराचा एका ठिकाणी विजय झाला असून सेनेला खातंही उघडता आलेलं नाही. एका जागेवरील चिठ्ठीचा निकाल बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sonia Farande success story
Maharashtra Tunnel Project Three New Underground Routes to Connect Mahabaleshwar Kas Medha and Tapola for Faster Travel
Dr Neeraj Hatekar speaks on long-term solutions to drought at a programme in Khatav.
Shambhuraj Desai Diwali with farmers in Satara