Nag Panchami
Nag Panchamiesakal

नागपंचमीला ना झोका, ना झिम्मा फुगडी; मायणीत साधेपणाने पंचमी!

नागोबाच्या पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन; महिलांची प्रचंड गर्दी

मायणी (सातारा) : कोरोनाच्या (Coronavirus) भीतीपोटी मायणीसह परिसरात नागपंचमीचा सण (Nag Panchami 2021) अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यामुळे नटून-थटून गोळ्यामेळ्याने गाणी गात, झोका, झिम्मा व फुगडी खेळणाऱ्या महिलांचे घोळके निदर्शनास आले नाहीत. नागपंचमी सणानिमित्त सुट्टी काढून गावोगावी प्रतिवर्षी माहेरवाशिणी हमखास येत असतात. आपल्या परिवारासह मैत्रिणींना भेटत असतात. सुख-दुःखाची देवाण-घेवाण करीत असतात. सणासुदीच्या निमित्ताने नवी वस्त्रे, अलंकार परिधान करीत असतात.

Summary

कोरोनाच्या (Coronavirus) भीतीपोटी मायणीसह परिसरात नागपंचमीचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

नटून-थटून गोळ्यामेळ्याने आनंदाने गाणी गात असतात. झोका, झिम्मा व फुगडी खेळत असतात. मात्र, माहेरवाशिणींच्या आनंदावर कोरोनामुळे यंदाही पाणी फिरले. कोरोनाच्या भीतीमुळे महिलांनी घराबाहेर पडणे, गर्दी करणे टाळल्याचे दिसून आले. नागपंचमीनिमित्त ठिकठिकाणी रंगणारे महिलांचे लक्षवेधक खेळ निदर्शनास आले नाहीत. दरम्यान, येथील श्री संत सेना महाराज नाभिक संघटनेच्या वतीने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून नागपंचमीचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. येथील पुरातन महादेव मंदिरामध्ये सकाळी ११ वाजता नागोबाच्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, तर धनगर विठोबा मंदिरामध्ये दुसऱ्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये. यासाठी संघटनेच्या वतीने एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

Nag Panchami
उदयनराजेंनी केलेल्या पराभवाचा सहकारमंत्री वचपा काढणार?

त्यानुसार, येथील नाभिक समाजातील लोकांनी नागोबाच्या मातीच्या मूर्ती घरोघरी पोहोच केल्या नाहीत. परिणामी, अनेकांना नागोबाची प्रथेनुसार पूजा करता आली नाही. दरम्यान, मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केलेल्या नागोबाचे पूजन करून महिलांनी मनोभावे दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेशबंदी असल्याने महिलांसह अन्य भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच नागोबाचे दर्शन घ्यावे लागले. दरम्यान, सायंकाळी सहा वाजता दोन्ही मंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या नागोबाच्या पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. प्रतिवर्षी येथील महादेव मंदिरामध्ये होणारी महिलांची प्रचंड गर्दी यंदा मात्र कोरोनामुळे दिसून आली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com