Scattered school bag and books after fatal Nagthane accident; father and daughter killed as tempo hits bike.Sakal
सातारा
Satara Accident:दुर्दैवी घटना! 'नागठाणेत अपघातात बाप-लेकीचा मृत्यू'; टेंपोची दुचाकीला धडक; दप्तर अन् पुस्तके विस्कटली
Tragic Accident in Nagthane: अपघातातील जखमी बाप-लेकीला उपचारासाठी साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्या दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
काशीळ : नागठाणे (ता. सातारा) येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर टेंपोच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकीचा मृत्यू झाला. इब्राहिम हसन शेख (वय ३८) व महेक इब्राहिम शेख (वय १२, सध्या रा. नागठाणे ता. सातारा. मूळा रा. जवुळके खुर्द, रेटवडी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.