नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी : पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज चव्हाण

नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी : पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

कऱ्हाड : पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले. त्यामागे पंजाब व उत्तर प्रदेशातील निवडणुकाच कारमी भूत आहेत. या आंदोलनात ६०० हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर अपेक्षात आहे. त्यासह देशाच्या अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाम यांनी टिव्टव्दारे केली आहे.

आमदार चव्हाण म्हणतात, काळे कृषी कायदे मागे घेणे हा शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतला. पण या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण? तसेच अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी देशावर लादले गेलेल्या कृषी विषयक कायद्याच्या रद्द झालेल्या आध्यादेशांनाही त्वरीत मान्यता द्यावी, असाही आग्रह आमदार चव्हाम यांनी टिव्टव्दारे केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक कायदे रद्द केल्यानतर आमदार चव्हाण यांनी त्वरीत त्यांची प्रतिक्रीया टिव्टव्दारे व्यक्त केली आहे. कोरोना महामारी सुरू असताना काळे कृषी कायदे अध्यादेशाद्वारे लादले गेले होते, आता ते रद्द केले आहे. ते करतानादेखील त्यांच्या रद्दतेचा तत्काळ अध्यादेश काढून ते कायदेस रद्द करावेत. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर या अध्यादेशांना मान्यता घेण्यात यावी, अशीह मागणी त्यांनी केली आहे.

loading image
go to top