हेलिकॉप्टर अपघात टाळण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी मोदींना दिल्ला महत्वाचा सल्ला

तामीळनाडू येथे हेलिकॉप्टरच्या अपघातात सैन्याच्या सर्वोच्च पदावरील अधिकारी, त्यांच्या वरिष्ठ सैनिक अधिकाऱ्यांचा अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Prithviraj-Chavan
Prithviraj-ChavanSakal

कऱ्हाड - तामीळनाडू येथे हेलिकॉप्टरच्या अपघातात सैन्याच्या सर्वोच्च पदावरील अधिकारी, त्यांच्या वरिष्ठ सैनिक अधिकाऱ्यांचा अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. असे प्रकार घडू नये, यासाठी अतीसुरेक्षची हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी. त्यात काटकसर करून उपयोग नाही. पाच ते सात हजार कोटींची विमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीसुरक्षेची स्वतः साठी घेतली आहेत. त्या प्रमाणे हेलिकॉप्टर देखील चांगल्या दर्जाची व सुरक्षीत उपकरणे असलेली घेणे गरजेचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

तामीळनाडू येथे जनरल बिपीन रावत यांच्यासह चौदाजणांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात दुर्देव अंत झाला. त्याबाबत आमदार चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली. आमदार चव्हाण म्हणाले, अपघात दुर्देवी आहे. सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांचा निधन धक्कादायक आहे. खरे म्हणजे त्यांचे हेलिकॉप्टर व्हीआयपी ड्युटीसाटी वापरले जाणारे रशीयन बनावटीचे आहे. ते सुरक्षीत असं हेलिकॉप्टर समजले जाते. त्याला डबल इंजिन आहे. त्यामध्ये खूप पॉवरफुल्ल दोन इंजीन आहेत. त्यामुळे इंजीन बंद पडण्याचा प्रकार कधी घडत नाही.

मात्र, कुठेतरी कमी उंचीवर उतरताना झाडाला वैगेर कुठेतरी धडकल्याने अपघात झाला असावा, अर्थातच धुक दाट होते. कमी दिसत होते. पाऊसही होता. अशा हवामानात उड्डाण करायला पाहिजे होते का, ते टाळता आले असते का असे यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या सगळ्याची चौकशी होईलच. त्यातून खर काय घडल ते बाहेर येईल. मात्र अस बऱ्याच वेळा घडते. दबाव असतो. आपण गेलेच पाहिजे. कार्यक्रम महत्वाचे असतात. व्हीयापींना किंवा राजकीय व्हीआयपी महत्वाचे असतात. त्यामुळे आपण थोडी रिस्क घेवून पाहूया, असा निर्णय होतो. अर्थात तो दबाव पोलिटिकल व्हीआयपीव्दारेच असतो, वैमानिक काय तयार नसतात. मात्र त्यांच्यावरही दबाव टाकून त्यांना तयार केले जाते.

Prithviraj-Chavan
ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव वाहू लागला; पाहा व्हिडिओ

अपघातातून दोन गोष्टी निष्पन्न होतात. व्हीआयपीसाठी एकतर आपण चांगली रडार यंत्रणा असलेली हेलिकॉप्टर घ्यायालाच हवीत. ती घेण्याचा प्रयत्न युपीए सरकार असताना झाला. ऑगस्ट वेस्टलॅन्ड कंपनीडून हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न केला. त्यात दलालीचा देण्याचा प्रयत्न झाल्याने ती ऑर्डर रद्द झाली. त्यातून काही हेलिकॉप्टर आली मात्र ती वापरली जात नाहीत. मात्र येथून पुढे तरी अती सुरेक्षेची हेलिकॉप्टर घेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींनी पाच ते सात हजार कोटींची अती सुरक्षेची विमाने स्वतःसाठी घेतली आहेत. त्या प्रमाणे हेलिकॉप्टरही घ्यायलाच हवीत. त्यात काटकसर करून उपयोग नाही. सुरक्षीत उपकरणांची हेलिकॉप्टर हवीतच त्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा.

हेलिकॉप्टर अपघातात यापूर्वी मोठे नेते देशाने गमावले आहेत. जगनमहोन रेड्डी, माधवराव सिंदीयासरखे नेते योग्य हवामान नसताना उड्डाण भरल्याने अपघात होवून गमावले आहे. वास्तविक ते टाळता येण्यासारखे अपघात आहेत. त्याकरीता काटेकोर प्रोटोकॉल प्रस्थपीत झाला पाहिजे. त्यामध्ये पंतप्रधान मोंदी यांनी स्वतः लक्ष घातले पाहिजे. कारण येमारा दबाव टाळता आला पाहिजे. रशियन हेलिकॉप्टरची पॉवर फुल्ल इंजीन असले तरी त्यात रडारसाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे पॉवरफुल नाहीत. त्या पद्धतीने बदल करून तशी हेलिकॉप्टर खरेदी करावीत. त्यात काटकसर करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com