esakal | 'त्या' डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; 'रासप'ची पोलिसांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

मायणीत एका गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वडूजातील डॉ. काझी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षसंघटनेने केली आहे.

'त्या' डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

sakal_logo
By
संजय जगताप

मायणी (सातारा) : येथील एका गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वडूज येथील मातृसेवा हॉस्पिटलमधील (Matruseva Hospital) डॉ. काझी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षसंघटनेने (National Social Party Organization) दिला आहे. त्यासंबंधीचे लेखी निवेदन तहसीलदार व वडूज पोलिसांना (Vaduj Police) देण्यात आले आहे. निवेदनातील माहिती अशी, मायणी येथील स्वाती बाबू माने या गर्भवतीला त्यांचे पती व नणंद यांनी बाळंतपणासाठी वडूज येथील मातृसेवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. त्यावेळी तिची तब्बेत अगदी ठणठणीत होती. काहीही घाबरायचे कारण नाही. तिची डिलिव्हरी नॉर्मल होईल, असे तेथील डॉ. काझी यांनी सांगितले. (National Social Party Has Demanded The Government To File A Case Against Dr. Qazi Satara Crime News)

गर्भवतीला कळा येत नसल्याने डॉ. काझी यांनी तिला सलाईन लावून इंजेक्शन दिले. त्यानंतर स्वाती यांना रक्तस्त्राव सुरू झाला. त्यातच त्यांची तब्बेत खालावली. पेशंट सिरियस झाला असून, उपचारासाठी अन्यत्र हलवावे लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार ते स्वतः आम्हा सर्वांना घेऊन कऱ्हाड येथील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये (Krishna Charitable Hospital) गेले. त्यावेळी तेथे स्वातीचा मृत्यू झाला. तिला तीन मुली आहेत.

हेही वाचा: 'गोल्ड ट्रेडिंग'मधून 74 लाखांची फसवणूक

National Social Party

National Social Party

त्यामुळे डॉ. काझी यांच्या हलगर्जीपणा व चुकीच्या उपचारांमुळेच स्वातीचा मृत्यू झाला असून, डॉ. काझी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मेडिकल कौन्सिलमार्फत (Medical Council) संबंधित डॉक्टरचा परवाना रद्द करावा, अन्यथा वडार समाज व राष्ट्रीय समाज पक्षामार्फत (National Social Party) तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. नियोजनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आदींना पाठवण्यात आल्या आहेत.

National Social Party Has Demanded The Government To File A Case Against Dr. Qazi Satara Crime News

loading image