रेमेडिसिव्हर इंजेक्‍शनच्या 'त्या' प्रकरणावर राष्ट्रवादी आक्रमक

रेमेडिसिव्हर इंजेक्‍शनच्या 'त्या' प्रकरणावर राष्ट्रवादी आक्रमक

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातून रेमेडिसिव्हर इंजेक्‍शनची चोरी झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमही बदलली
 
निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना दिलेल्या निवेदनात श्री. माने व श्री. पाटील यांनी म्हटले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना वाचविण्यासाठी रेमेडिसिव्हरची सुरवातीला 125, तर कऱ्हाडला 50 अशी एकूण 175 इंजेक्‍शन जिल्ह्याला दिली होती. यापैकी काही जिल्हा रुग्णालयात, तर काही कऱ्हाडला पाठविली होती. या इंजेक्‍शनचा वापर गरजू व सर्वसामान्य रुग्णांसाठी करावीत, अशी सूचनाही श्री. पवार यांनी केली होती.

भय इथलं संपेना, कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने अडीचशेचा टप्पा ओलांडला

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पार्थ पवार म्हणतात...
 
परंतु, जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमधून यातील काही इंजेक्‍शन चोरीला गेल्याचे समजले आहे. त्यामुळे ही इंजेक्‍शन कोणाला वापरली. त्याची यादी द्यावी, तसेच चोरीला गेलेल्या इंजेक्‍शनचा तपास करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य संचालक, पोलिस अधीक्षकांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. या वेळी श्री. माने व श्री. पाटील यांच्यासमवेत निवास शिंदे, शफिक शेख, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, नलिनी जाधव, उद्धव बाबर उपस्थित होते.

पगारदारांनो... सातारा जिल्हा बॅंकेने आणली तुमच्यासाठी अनाेखी याेजना

राष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्‍शन, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन चोरीचे कोणास इंफेक्‍शन? 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com