
सातारा : विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा आधार घेऊन पदाला साजेसे काम करावे. यातून लोकांना न्याय मिळवून दिला तर तो भविष्यात आमदारही होऊ शकतो. इतकी ताकद या पदामध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पदाला साजेसे काम करावे, अशी अपेक्षा आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या नूतन कार्यकारिणीचा मेळावा नुकताच राष्ट्रवादी भवनात झाला. या वेळी आमदार शिंदे बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील गवाणे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, विद्यार्थी सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम, प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, गजेंद्र मुसळे, विभागीय उपाध्यक्ष सहर्ष घोलप, विनोद भांगे, जिल्हाध्यक्ष वैभव कळसे उपस्थित होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, ""भविष्यकाळ स्पर्धेचा असून, मोठ्या आव्हानासमोर जिल्ह्यातील विद्यार्थी उभा राहिला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. कुठल्याही क्षेत्रात मनापासून उतरल्यास ते क्षेत्र तुम्हाला नावलौकिक मिळवून देते. विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या आधार घेऊन पदाला आणि लोकांना न्याय मिळवून दिला तर तो भविष्यात आमदारही होऊ शकतो. इतकी ताकद या पदामध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम करावे.''
सुनील माने म्हणाले, ""राजकारणात पद मिळाले की लेटरपॅड, व्हिजिटिंग कार्ड छापणे यापुरते मर्यादित राहू नका, तर आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम झाले पाहिजे. प्रत्येक कॉलेजमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची स्थापना करावी.'' या वेळी सुनील गवाणे यांनी प्रत्येक पदाची जबाबदारी सांगितली.
पक्ष मजूबत करा; राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांकडून सदस्यांची कानउघडणी
या वेळी जिल्हा उपाध्यक्षपदी सागर पवार, स्वप्नील डोंबे, अक्षय परदेशी, तन्मय कदम, श्रीधर कदम, सातारा तालुकाध्यक्षपदी सचिन जाधव, शहराध्यक्षपदी अश्विन मस्के, सचिवपदी गौरव कासट, हर्षल भोईटे, कोरेगाव तालुकाध्यक्षपदी प्रथमेश पवार, कऱ्हाड दक्षिण अध्यक्षपदी अक्षय पाटील, फलटण तालुकाध्यक्षपदी अभिजित निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. वैभव कळसे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण यादव यांनी आभार मानले.
युवकाच्या मृत्यूप्रकरणी एकास अटक; आटकेत संशयिताचे घर पेटवण्याचा घडला प्रकार
शेतकऱ्यांनाे! वीजबिलातील 50 टक्के सवलतीचा लाभ घ्या; महावितरणचे आवाहन
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.