खतांची दरवाढ करुन भाजपनं पाप केलंय; मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

देशात व राज्यात पेट्रोलच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांवर पेट्रोलचे दर गेले आहेत.
NCP
NCPesakal

वाई (सातारा) : पेट्रोल, डिझेल (Petrol Diesel) व शेतीतील खतांच्या दरवाढीबाबत वाई तालुका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) वतीने आज केंद्र सरकारचा (Central Government) निषेध करण्यात आला. त्याबाबतचे निवेदन पक्ष संघटनेच्या वतीने तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले. (Nationalist Youth Congress Agitation Against The Central Government At Wai Satara News)

देशात व राज्यात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांवर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाट वाढविण्याचे काम सरकारने केले आहे. 10.26.26 ची किंमत 600 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे त्याचे 1175 रुपये किमतीचे 50 किलोचे पोते आता 1775 रुपयांना मिळणार आहे. डिएपीची जवळपास 715 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 1185 रुपये किमतीचे डिएपी पोते आता 1900 रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत.

NCP
साहेब.. सगळं काही उद्ध्वस्त झालं, आता तुम्हीच काहीतरी करा; शेतकऱ्यांची खासदारांना आर्त साद

देशातल्या खतांची किंमत वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून या विरोधात राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्‍याच्या ठिकाणी आंदोलन हाती घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जाहीर केले आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे, अशी मागणी निवेदनात केली आहे. या वेळी तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष व पंचायत समिती उपसभापती विक्रांत डोंगरे, रवींद्र भोसले, शहराध्यक्ष प्रसाद देशमुख, बाजार समिती संचालक कुमार जगताप, श्रीधर भाडळकर (घोरपडे) व युवक उपस्थित होते.

Nationalist Youth Congress Agitation Against The Central Government At Wai Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com