Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांना साताऱ्याच्या बासुंदी चहाची भुरळ; नायगावातील प्रदर्शनात घेतला आस्वाद
Satara News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांनी प्रदर्शनामध्ये सर्व गटांना भेटी देऊन बचत गटांच्या महिलांशी संवाद साधून गटांच्या नावीन्यपूर्ण व पारंपरिक उत्पादनांचे कौतुक केले.
सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱ्यातील बासुंदी चहाने भुरळ घातली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.