
-रूपेश कदम
दहिवडी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या वादळात राष्ट्रवादीचा टिकाव लागणार का? याची मोठी उत्सुकता राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही निवडणूक पक्षीय की महायुती व महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली जाणार हे पाहावे लागणार आहे, तसेच ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत आजपर्यंत कधीही पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळविणे शक्य झाले नाही, तो करिष्मा यावेळी करून दाखवला जाणार का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.