
महाबळेश्वर : शिवजयंतीनिमित्त किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात झाली. या वेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताह व किल्ले, गडकोट स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. स्वतः मंत्री मकरंद पाटील यांनी हातात झाडू घेऊन प्रतापगड किल्ल्याची स्वच्छता केली.