
बापू आले आणि का गेले, याची चर्चा रंगली. अखेर शशिकांत शिंदेंनी भाषणात दीपकबापू नाराज झालेत. त्यांची नाराजी दूर करू, योग्य वेळी पक्ष त्यांचा सन्मान करेल, असे स्पष्टीकरण दिले.
मेढा (जि. सातारा) : सातारा जिल्ह्याची एक संस्कृती आणि विचार आहे, तो अखेरपर्यंत जिवंत ठेवणार असून दुसरा विचार येथे येऊ देणार नाही, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मेळाव्यापूर्वी आलेले दीपक पवार काही काळातच निघून गेल्याने त्याचीच चर्चा रंगली होती.
मेढा येथे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या सभेत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, सुनील माने, एस. एस. पार्टे, सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, एकनाथ ओंबळे, यशवंत घाटगे, धनश्री महाडिक, रोहिणी निंबाळकर उपस्थित होते. सदाशिव सपकाळ, एस. एस. पार्टे आदींची भाषणे झाली. सुरेश पार्टे यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, मेळाव्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार आले. त्यांनी व्यासपीठावर सभापती जयश्री गिरींना पाहिले. त्यानंतर ते आमदार शशिकांत शिंदेंशी बोलून निघून गेले. बापू आले आणि का गेले, याची चर्चा रंगली. अखेर शशिकांत शिंदेंनी भाषणात दीपकबापू नाराज झालेत. त्यांची नाराजी दूर करू, योग्य वेळी पक्ष त्यांचा सन्मान करेल, असे स्पष्टीकरण दिले.
विधानसभेच्यावेळी माझ्या विरोधात घरोघरी जावून भाजपचा प्रचार करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्टेजवर कशासाठी? त्यामुळेच मी निघून गेलो. शरद पवारांचे विचार मानणारा मी असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचेच काम करणार आहे.
- दीपक पवार, सदस्य, जिल्हा परिषद, सातारा
सरकार विरोधात जनतेत चीड : शिवेंद्रसिंहराजे भोसले
Edited By : Siddharth Latkar