

NCP members reportedly at undisclosed location as Satara Zilla Parishad power struggle intensifies.
sakal
सातारा : जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने राजकीय उलथापालथ होणार, हे स्पष्ट आहे. भाजपकडे बहुमताचा आकडा नसला तरी अध्यक्ष भाजपचाच होणार, या आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही सावध पवित्रा घेत प्रतिउत्तराची रणनीती आखली आहे. सत्तेच्या समीकरणासाठी सदस्यांच्या फोडाफोडीच्या धास्तीने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सावध पवित्रा घेत एकजूट गटासाठी आज सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याची चिन्हे दिसत आहेत.