कऱ्हाड - सातारा जिल्ह्याने ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम करून पाठींबा दिला. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्यांनी उभा केलेला महाराष्ट्र त्यांच्या विचाराने पुन्हा उभा करण्याची प्रेरणा घेण्यासाठी मी आलो आहे. असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकात शिंदे यांनी महाराष्ट्र जातीयवाद्यांच्या ताब्यातून मुक्त व्हावा अशी मागणी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे मागणी केली असे सांगीतले.