
सातारा : शरद पवार यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्रात मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. काल सांगली आणि आज सातारा येथे हा मेळावा प्रभारी म्हणून घेत आहोत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा शोध आणि बोध याद्वारे आम्ही घेत आहोत. पराभवाची कारणे काय आहेत, काय झाले, कसे झाले? हे सगळ्यांना माहीत आहे, त्याच्या खोलात आम्ही जात नाही. आगामी काळात जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणे ही भूमिका घेत आम्ही सक्रिय झालोय. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची जाणून घेत त्यानुसार यापुढील रणनीती आखणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.