shashikant shinde
sakal
कऱ्हाड - सरकारने दिवाळीपुर्वी पाच हजार रुपये देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. सरकारची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. निर्णय काय घ्यावा हे त्यांना सुचत नाही. दुष्काळी तालुक्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सुचना नाहीत. हे सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी १ लाख रुपये शेतकऱ्यांना द्यावेत, अशी आमची मागणी आहे. योग्य निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला.