
भिलार : भिलारजवळील कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील एका हॉटेलवर तोकड्या कपड्यात अंगविक्षेप करून नृत्य करीत असलेल्या १२ बारबाला, हॉटेल मालकासह ३३ जणांना पाचगणी पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह ताब्यात घेतले. कासवंड हद्दीतील हॉटेल बेला व्ह्यूमध्ये मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.