बातमी कानावर पडताच कऱ्हाडातील पालक, विद्यार्थी आनंदले

दिलीपकुमार चिंचकर
Friday, 11 September 2020

यावर्षीची नीट परीक्षा येथील केंद्रावर होणार असल्याने विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे.

कऱ्हाड : नीट परीक्षेसाठी कऱ्हाड केंद्राला मंजुरी मिळाली आहे. मेडिकलला प्रवेश घेण्यासाठीची ही परीक्षा येत्या 13 सप्टेंबरला दुपारी दोन ते पाच या वेळेत होईल. मे महिन्यात होणारी परीक्षा कोरोनामुळे सप्टेंबरमध्ये पुढे ढकलण्यात आली हाेती. 

मेडिकलला जाण्यासाठी नीट परीक्षा तालुकास्तरावर व्हावी, यासाठी डॉ. महेश खुस्पे यांनी एप्रिल महिन्यात केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. त्यामुळे यावर्षी कऱ्हाड येथे नीट या परीक्षेचे केंद्र मंजूर झाले असून, शासकीय पॉलिटेक्‍निक कऱ्हाड व पोदार इंटरनॅशनल स्कूल कऱ्हाड येथे नीट परीक्षा केंद्र होणार असून, यावर्षीची नीट परीक्षा येथेच होणार आहे. 

शिवविचार खरंच आपण अंमलात आणतो का? : अश्विनी महांगडे

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या कामात श्री. खुस्पे यांना पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, कृष्णा उद्योगसमूहाचे अतुल भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले. परीक्षा केंद्र कऱ्हाड येथे झाल्यामुळे पालक व विद्यार्थी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे.

आता राज्यातील मराठा समाजाच्या नजरा उदयनराजेंकडे 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neet Exam Center Approved In Karad Satara News