
सातारा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या पुणे व फलटण येथील निवासस्थानी, तसेच गोविंद दूध डेअरीवर काल सकाळी सहा वाजल्यापासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. कालप्रमाणे आजही दिवसभर त्यांच्या घर, दूध डेअरी आणि शिक्षण संस्थांच्या व्यवहारांची चौकशी झाली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती.