esakal | मुंबईकर खूष; आता निमसोडहून परेलला बस
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकर खूष; आता निमसोडहून परेलला बस

प्रशासनाने काही अटी व शर्ती लागू करून बससेवेस परवानगी दिली आहे. 

मुंबईकर खूष; आता निमसोडहून परेलला बस

sakal_logo
By
शशिकांत धुमाळ

निमसोड (जि. सातारा) : वडूज आगाराच्या निमसोड-परेल या बससेवेचा प्रारंभ येथे चावडी चौकात मोहन देशमुख, आगारप्रमुख कुलदीप डुबल, नामदेव पवार, विनायक देशमुख, शिवाजी घाडगे, सुरेश खिलारे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी श्री. देशमुख यांनी वडूज आगाराने चाकरमान्यांसाठी उपयुक्त बससेवा सुरू केल्याने आगाराला धन्यवाद दिले.

आगारप्रमुख डुबल म्हणाले, ""प्रशासनाने काही अटी व शर्ती लागू करून बससेवेस परवानगी दिली आहे. त्या अनुशंगाने सर्व खबरदारी घेत बससेवा सुरू आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.''

लज्जास्पद! माण तालुक्‍यात गर्भवती महिलेला मारहाण, तीन महिलांसह सहा संशयितांवर गुन्हा

नीलेश घार्गे यांनी सूत्रसंचालन केले. शेखर देशमुख यांनी आभार मानले. या प्रसंगी शिवाजी चौधरी, लक्ष्मण पवार, प्रमोद मोरे, पप्पू देशमुख, विशाल लावंड, राहुल इनामदार, शुभांगी कांबळे, मोहन महाडिक, संतोष बोराटे, रवी सानप, किरण थोरात, मंगेश पळसुळे आदींची उपस्थिती होती.

Edited By : Siddharth Latkar

loading image