Covid 19 : काेरेगाव, क-हाड तालुक्यातील बाधितांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 29 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 83 हजार 385 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 45 हजार 790 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 40 हजार 772 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 518 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या तीन हजार 500 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा  : सातारा जिल्ह्यात चाेवीस तासात उपचारादरम्यान नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान 555 रुग्णांना उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. याबराेबरच 316 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
 
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेताना साताऱ्यातील गुरुवार पेठेतील 50 वर्षीय पुरुष, पिंपोडे (ता. कोरेगाव) येथील 90 वर्षीय महिला, खेडमधील (ता. कोरेगाव) 80 वर्षीय महिला, नागझरीतील (ता. सातारा) 73 वर्षीय पुरुष, कुमठे (ता. कोरेगाव) येथील 60 वर्षीय पुरुष, बिदालमधील (ता. माण) 75 वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील 80 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये बेलवडे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील 70 वर्षीय महिला, वाठार (ता. कऱ्हाड) येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनोज शेंडेंना मिळणार सातारा पालिकेचे उपाध्यक्षपद 

नमुने घेतलेले संशयित- 1,83,385
 
एकूण बाधित- 45,790

घरी सोडलेले रुग्ण- 40,772
 
मृत्यू- 1,518
 
उपचार सुरू असलेले रुग्ण- 3,500


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Covid 19 Patients Passes Away In Satara News