Amol Mohite Wins with Massive Margin of 42,000 Votes

Amol Mohite Wins with Massive Margin of 42,000 Votes

Sakal

Satara Election Results: साताऱ्यात नऊ अपक्षांचा दे धक्का! 'मनोमिलनाचा विजय; बंडखोरांचा दणका', अमोल मोहिते यांना ४२ हजारांचे मताधिक्य..

Rebel candidates play Decisive Role in Satara polls: साताऱ्यात बंडखोरांचा विजय, मनोमिलनाच्या उमेदवारांना धक्का
Published on

-गिरीश चव्‍हाण

सातारा : सातारा पालिकेच्‍या नगराध्‍यक्ष, तसेच ४७ नगरसेवक पदासाठीच्‍या झालेल्‍या निवडणुकीत दोन्‍ही राजांच्‍या ३८ उमेदवारांनी मनोमिलनाचा पर्यायाने भाजपचा गड राखला; परंतु मनोमिलनाच्या उमेदवारांना बंडखोरी केलेल्‍या नऊ जणांनी धक्का देत विजय खेचून आणला. थेट नगराध्‍यक्षपदाच्‍या लढतीत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अमोल मोहिते यांनी ५७ हजार ५९६ मते मिळवत विजय मिळवला. त्‍यांच्‍याविरोधातील महाविकास आघाडीच्‍या उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांना १५ हजार ५५६ इतकी मते मिळाली. मोहिते यांचे ४२ हजार ४० इतके मताधिक्य असून, शिवसेनेने एका जागेवर यश मिळवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com